गुरुवार, ११ ऑक्टोबर, २०१२

गोंदण

>सुख -दु :ख ,लहान -थोर ,चढ -उतार अशा परस्परविरोधी अर्थांच्या शब्दांच्या जोड्याही प्रत्येक भाषेत जुळ्या भावंडा सारख्या एकाच प्रसुतीत जन्म घेत असतातआणि तरीही स्वत :च्या त्या त्या अर्थाचं स्वतंत्र अस्तित्वही अबाधित राखतात.सुखाने न माजणार आणि दु:खाने न खचणार जागृत मन लाभण ही निसर्गाची केवढी थोर देणगी मला मिळाली.

>अचूक मारलेल्या एका बाणाची आणि समोरून धावत येणाऱ्या नरभक्षक वाघाची शक्ती हि समतोलाच नसते का? निसर्गात लवलवनाऱ्या नवाज्यात तृणपर्णाइतकाच , जीर्णशीर्ण होऊन कोसळणारा वृक्षही चित्तवेधक नसतो का? एखादं दृश्य जसं सुंदर असतं, तसंच एखादं कृत्य -एखादा विचार -एखादी कल्पनाही.सोंदर्य पाहणाऱ्याच्या डोळ्यांतच असतं.या अस्तित्वाला सातत्य असतं,तशीच आवड-निवडही असते


मनातलं अवकाश - सुनिती देशपांडे 
_______________________________________________________________________


> जेव्हा एखाद्या परिस्थितीवर हसाव कि रडाव हे कळत नाही तेव्हा पहिला पर्याय निवडावा.’

>‘जगात दोन प्रकारची माणसे कधीही यशस्वी होत नसतात. एक म्हणजे सगळ्यांच ऐकणारी आणि दुसरी म्हणजे कोणाचही ऐकणारी.’

>‘प्रत्यक्षात येण कितीही अवघड असल तरी तुमच्या स्वप्नांचा ध्यास सोडू नका, करावीशी वाटेल ती प्रत्येक गोष्ट करून पाहा, जिथे जावस वाटेल तिथे जाआयुष्य एकदाच मिळत आणि संधीही पुन्हा पुन्हा येत नसते.’

>‘स्वतःशी प्रामाणिक राहायचं म्हणजे दुसऱ्यांशी बेईमानी करावीच लागते.’

>‘विचार कुठूनही घ्यावेत पण ते नीट तपासून पहावेत.’  
_______________________________________________________________________ 


मृत्युंजयमधील सुरुवातीची काही वाक्य,..... मला फार आवडलेली

>‘सत्य हे पाहणाऱ्याच्या किंवा ऐकणाऱ्याच्या इच्छेचा विचार कधीच करत नसत. ते नेहमीच जस असत तसच पुढे येत असत. उगवत्या सूर्यासारख.’
>‘आठवणी या नेहमी हत्तीच्या पायांसारख्या असतात. त्या आपला खोलवर ठसा मनाच्या ओलसर भूमीवर मागे ठेवूनच जातात.’
माझी सगळ्यात आवडती दोन वाक्य
>‘अश्रू दे दुबळ्या मनाच प्रतीक आहे. जगातील कोणत्याही दुःखाची आग अश्रूंच्या पाण्याने कधीच विझत नसते.’
>‘स्वप्न म्हणजे काय आहे? अतृप्त मनाच्या इच्छा पुरवणारा कल्पवृक्ष.’

गुरुवार, १३ सप्टेंबर, २०१२

Velas Turtle Festival

ब्लोग लिहण्यासाठी या गोष्टीला तसा फार वेळ  झालाय ,पण काहीतरी लिहाव असं वाटतंय म्हणून ........

ससा  आणि कासव यांच्या शर्यतीची गोष्ट सर्वांनाच माहित आहे, ते सोडल्यास "कासव- एक उभयचर प्राणी" अशीच काहीशी थोडक्यात ओळख काही जणांपुरती मर्यादित असते.

कासव हा प्राणी जगातील सर्वात जास्त काळ जगणाऱ्या प्राण्यांपैकी एक.
Seychelles Giant Tortoise तर २०० वर्षे जगल्याचे पुरावे आहेत .



पण कासवांच्या अंड्यांची तस्करी हि काही नवीन गोष्ट नाही
लहान कासवांची पिल्ली आजकाल शोभेच्या मास्यांसोबत पाळण्याचा छंद आणि उद्योग याला खतपाणी घालतो .अशीच काहीशी तस्करी अरबी  समुद्र किनारीही चालू होती, आजही काही  प्रमाणात असेलही पण याला आळा घालण्यासाठी "सह्याद्री निसर्ग मित्र","वेळास ग्रामपंचायत"  आणि  "वन खाते - महाराष्ट्र राज्य सरकार"यांच्या संयुक्त प्रयत्नांनी कासवांच्या अंड्यांचे जतन करून,त्यांना नैसर्गिकरीत्या उबवून योग्यवेळी समुद्रात सोडले जाते.
हि मोहीम बरीच वर्षे चालू आहे अलिबाग  पासून ते खाली तळकोकणात सुद्धा अविरतपणे चालू आहे.

साधारणतः फेब्रुवारी-मार्च महिन्यात हा कार्यक्रम राबवला जातो. भरतीच्या वेळी जेव्हा मादा कासवं वाळूच्या घरट्यामध्ये अंडी घालून परत चाललेली असतात तेव्हा सकाळी लवकर उठून मंडळाचे सदस्य समुद्रकिनारी जातात.त्या  कासवांच्या पायांच्या ठश्यांच्या मार्गाने जावून अंडी शोधली जातात,मग ती अंडी गोळा करून संरक्षित ठिकाणी एकत्र कुंपणात ठेवली जातात.रोज  सकाळी व  सायंकाळच्या वेळी अंड्यांतून निघालेली पिल्ले समुद्रात सोडली जातात.

पेपरमध्ये माझ्या वाचण्यात एकदा हि गोष्ट आली,आणि  मग मी इथे जायचं अस  ठरवलं,एका मित्राने (संतोष) येण्याची इच्छा व्यक्त केली,तो त्याची Swift घेवून ठरलेल्या दिवशी संध्याकाळी आला...
आम्ही रात्रभर प्रवास करून अखेर वेळासला सकाळी ६.४५ ला पोचलो.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कृपेने रस्त्यांवर Signboard नसल्यामुळे रात्री दोन ठिकाणी रस्ता चुकलो.

गाव फारच छान होतं, आम्ही एका घरात  थोडं  fresh झालो,बरोबर Offbeat sahyadri Group होता.
बरोबर ७.२० ला आम्ही सर्व समुद्रकिनारी गेलो जिथे घरटी होती.वनखात्याची माणसं येताच पिल्लांना एका टोपलीत जमा करण्यात  आले.पोलिस बंदोबस्त होताच.














मुंबईहून आमच्यासारखी बरीच मंडळी आली होती पिल्लांना  टोपलीतून नेतांना फोटो काढणाऱ्यांची  एकच  धांदल उडाली










आमच्या नशिबाने आम्हांला १६ कासवांची पिल्ले पाहायला मिळाली.त्यांना पाहिल्यावर रात्रभर केलेल्या प्रवासाचा शीण कुठच्या कुठे पळून गेला.
माझी मुलगी  सिद्धी तर जम खुश झाली.







तिथे एक सदस्य माहिती देत होते. ते म्हणाले की कासवांच्या पिल्लांना किनाऱ्यापासून एवढे दूर सोडायचे कारण तुम्हाला पाहता यावे हे नाही तर .......

ज्यावेळी पिलांमधील, मादी कासव किनाऱ्यावरील हे अंतर  कापून समुद्रात जाईल त्यावेळी ते इथले magnetic vibration capture करते आणि मोठी झाल्यावर अंडी देण्यासाठी ते परत याच किनारी येते........Anmazing na!!!!!



त्या  २०० वर्षे जगणाऱ्या कासवांच्या पिल्लांची पडणारी पहिली पावलं पाहून सरिता (पवार),मी,सिद्धी संतोष,सरिता (सावंत) सगळेच  दंग होतो

सोमवार, ११ जून, २०१२

माझे आकाशदर्शन


जगामध्ये अशा भरपूर गोष्टी असतात ज्यांना आपल्याला पाहणे शक्य असते पण त्यांच्यापर्यंत पोहचणे जवळजवळ अशक्य असते,त्यातील काही गोष्टी म्हणजे  " आकाशातील तारे,ग्रह"....

Solar System XXX.png

लहानपणापासूनच  याबद्दल विशेष आकर्षण होत.माझं भूगोल विषयांचे knowledge फारसं चांगलं नव्हत तसं तें आत्ताही नाहीये.पण..........
सुर्यमाला,ग्रह,तारे,दिशा,खंड,समुद्र,अशांश,रेखांश ,वृत्ते,मोसमी वारे,खारे वारे ,आवर्त वारे,प्रत्यावर्त वारे,मृदा ,खडक,महासागर, सामुद्रधुनी,गोलार्ध ,कटिबंध ,ग्रहण त्यामध्येही  खग्रास ,खंडग्रास,अमावस्या,पोर्णिमा,चंद्रकला  इ .विष यी  थोडीफार माहिती आहे.
 (यामधील  "थोडीफार "शब्द महत्वाचा )

मागे माझ्या एकेठिकाणी वाचनात आले कि एप्रिल  महिना हा आकाश निरीक्षणासाठी उत्तम असतो,निरभ् आकाश,नुकतीच  झालेली वसंत ऋतुची सुरुवात.
या वर्षी मला अशीच एक पर्वणी चालून आली."खगोल मंडळ" या संघटनेने 21 एप्रिल  2012 ला वांगणी येथेअशाच  एका कार्यक्रमाची आखणी केली होती.मीही त्यात  सहभागी होण्याच ठरवलं.
ऐनवेळी दोन मित्रांनी planning मधून काढता पाय घेतल्यामुळे मला एकट्याला जाणे  भाग होते.
त्या दिवशी आमच्या office ला सुट्टी देण्यात आली होती.कारणही तस थोड भलतच होत.
काय तर मन्हे  Central AC not working......


आमच्या office चा AC एन उखाड्याच्या सुरुवातीलाच बंद झाला. L & T ने आम्हाला Office रेंट वर   दिल्यामुळे हि त्यांची जबाबदारी होती ,आणि ते ती कित्येक दिवस टाळत होते.शेवटी असे असहकाराचे आंदोलन करून आम्ही अलीकडेच तो ठीक करून घेतला.


त्या दिवशी मी ६ वाजता ठाण्याहून कर्जतची लोकल पकडली,खूप दिवसांनी त्या भागामध्ये निघालो होतो.सोबत रात्र काढण्यासाठीचे सर्व साहित्य बरोबर घेतले होते.
अंदाजे ७ वाजता वांगणी रेल्वे स्टेशनवर पोचलो.तिथे खगोल मंडळ संस्थेचा एक युवक कार्यकर्ता हातात banner घेऊन उभा होता.त्याच्याशी ओळख केली आणि आणखी कोणी next local मधून येते का ते पाहण्यासाठी थांबलो.
अशा कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावणाऱ्या २-३ मुला-मुलींचा ग्रुप तेथे आम्हाला भेटला.आम्ही नियोजित स्थळी जाण्यासाठी निघालो.......


अमावस्या असल्यामुळे सोबत आणलेल्या टोर्चच्या प्रकाशात वाट तुडवत होतो,असे program हे अमावस्येलाच होतात - कारण आकाशात चंद्र नसल्यामुळे आकाश निरीक्षण चांगले करता येते.
आम्ही पोचलो तेव्हा program नुकताच चालू झाला होता.दोन गटांमध्ये पूर्ण सहभागी विभागलेले होते. इंग्लिश तसेच मराठी दोन्ही भाषांमध्ये astrophysics,नक्षत्रे,तारकासमूह,आकाशगंगा,ग्रह यांची बरीचशी कधीही न ऐकलेली माहिती अनेक उदाहरणे/गोष्टींचा दाखला देऊन आयोजक समजावत होते.मिट्ट काळोख्या रात्रीच्या चांदण्यात, चादर शेतात एका खळ्यावर अंथरून झोपून वर laser च्या pointer ने ते सर्व पाहणे फार कुतूहल जागवणारे होते.थोडा वेळ माहिती सांगणे, नंतर ग्रह,नक्षत्रे पाहण्यालायक स्तिथीत आल्यावर Telescope मधून ते पाहणे असा कार्यक्रम झाला. 


एक वेळा जेवणासाठी,दोनवेळा चहासाठी Break देण्यात आला,मी सोबत आणलेल्या फळे खाल्ली.(रात्रभर जागरण करायचे असल्यामुळे जेवण टाळले)


त्या रात्री आम्ही , अश्विनि ,रोहिणी ,म्रृगशीर्षा ,पुनर्वसु ,आश्लेषा ,पूर्व फाल्गुनी,उत्तर फाल्गुनी इ.नक्षत्रे तसेच शुक्र,मंगळ,शनी इ. ग्रह अनेक तारका समूह वेगवेगळ्या rang च्या telescope मधून पहिले.तो एक वेगळाच अनुभव होता आयुष्यात कधीही न विसरण्यासारखा!!!शनीची कडा


शनीचे विलोभनीय असे कडे
याच दरम्यान Lyrid नावाचे meteroid shower पाहायला मिळाले.ताशी पडण्याची Frequncy फारच कमी होती पण जे काही पहिले ते मस्त होते.... 
                                                       

प्रत्येक वयोगटातील माणसे तिथे आली होती,अगदी ८ वर्ष्याच्या मुलांपासून ते ५५ वर्ष्याचे पालक मी पहिले,प्रतेक्य जण group ने आला होता मी मात्र एकटाच होतो पण तसे जाणवले नाही.माझ्या अंदाजानुसार २५०-३०० माणसे कार्यक्रमा साठी आली होती.
सकाळी ४.३० वाजता कार्यक्रम संपला,पहिली local पकडून मी Via ठाणे-खारघरला येणार होतो,पण रात्रभर जागरण केल्यामुळे डुलकी लागली मग मी ठाण्याच्या समोर गेलो,मग कुर्ला मार्गे खारघरला आलो.




शुक्रवार, १८ मे, २०१२

काही अलिखित नियम.....त्यांचे फायदे अन तोटे
१.बसमधून/ट्रेनमधून उतरताना कधीही शेवटी उतरु नये. >>> वरती चढत असणारे तुडवतात.
२ लग्नाच्या पंगतीत कधीही शेवटी बासु नये.>>> पत्रावळीत सर्व पदार्थ मिळतीलच असे नाही.
३.submission कधीही पहिल्या वेळेत करू नये.>>> डझनभर शेरे मिळतात.
४.पकाऊ मीटिंग मधे एखादतरी googly question विचारावा >>> नंतर झोप काढता येते.

शुक्रवार, १३ एप्रिल, २०१२

सातारा (पुणे By pass)


सन - २००८ 
स्थळ - पनवेल बस स्थानक  
वेळ - सांय ६.३०

आमच्या एक मित्राच्या (बाळासाहेब) घराच्या "वास्तुशांतीसाठी" मी माझ्या दोन मित्रांसोबत (विक्रांत,प्रदीप) साताऱ्याला जायला निघालो.स्वातंत्र्यदिवसाच्या पुर्वसंधेचा हा प्रवास फारच thrilling होता.
भरपूर वेळ आमी मित्र गाडीची वाट पाहत उभे होतो.मुंबईकडून येणाऱ्या सर्वच बसेस भरून येत होत्या.
अर्धा ते पाऊन तास वाट पाहिल्यावर आम्ही कळंबोलीला जायचं ठरवलं.

स्थळ - कळंबोली
वेळ - सांय ७.३०

इथेही तीच परस्थिती होती.
पुन्हा अर्धा तास वाट पाहिल्यावर आम्ही standing ने जायचं ठरवले.
साताऱ्याला जाणारी बस आम्हाला मिळाली,बसायला जागा तर नव्हतीच पण त्यात आणखी एक भर म्हणजे बस Express Highway ने न जाता जुन्या मार्गे स्वारगेटला जाउन मग साताऱ्याला जाणार होती.





तशी आम्हाला उभे राहण्याची सवय असल्यामुळे काही वाटत नव्हते, पण प्रदीपला मात्र जड जाणार असे वाटत होते. तो पडला बिचारा A/C DEPT.(Cubical मधला) त्याला फारशी सवय नव्हती.आणि बस स्वारगेटला जाणार म्हणजे किमान १ तास तरी जास्तीचा लागणार होता.

पनवेल सोडल्यावर, तिकीट काढताना आम्ही conductor ला विचारले कि आपण Express Highway ने जाऊया का?

Conductor: तस आपण नाही करू शकत.

आम्ही: साहेब आपण लवकर जाऊ ना.

Conductor: ते नियमात बसत नाही.

आम्ही : साहेब जुन्या रोडवर Traffic jam आहे.

Conductor : तुम्हाला कस कळलं?

आम्ही : साहेब "Breaking News" होती TV वर 

Conductor : Toll कुठून देणार?

आम्ही : साहेब आम्ही देतो.

इतर प्रवाश्यानीही जोर दिल्यावर साहेब तयार झाले....

Conductor : ठीक आहे 

आम्ही मग थोड्या passengers कडून पैसे जमा केले(toll साठी ) आणि गाडी Express Highway ला टाकली.







स्थळ - चांदणी चौक,पुणे 
वेळ - रात्री  ९.३० 



पुण आल्यानंतर परत आम्ही सर्व passengers ना विचारलं,एक दोन जन पुण्याला जाणारे होते त्यांना पटवल.चांदणी चौकात  (ज्याला अस का म्हणतात ते मला अजून कळालेलं नाही) उतरवल.

(त्या प्रवाश्यांनी पुणेरीपन न दाखवता आमच कसकाय ऐकल हे सुद्धा एक न उकलणार कोडच आहे
  माझ्या मते ते मुळचे,स्थाईक पुणेकर नसावेत) 

आणि गाडी पुणं By Pass घेतली.



प्रदिपसाठी एव्हाना बसायला जागाही मिळाली होती.रात्रही झाली होती.संध्याकाळच मस्त गार वांर खात आम्ही उरलेला पुढचा प्रवास सुरु केला.... 












बुधवार, ४ एप्रिल, २०१२

स्मारक

मागे, मला अलिबागला जाताना स्वातंत्र्य सैनिकांचे एक हुतात्मा स्मारक दिसले....आणि मी बालापनात पोचलो.
कदाचित भरपूर लोकांना ते कसे असते,कसे दिसते ते माहितीही नसेल. असो...
तेंव्हा मी सातवीत होतो,वर्ग कमी असल्यामुळे आमच्या शालेचा हा वर्ग स्मारकात भरत असे.
त्या वर्गात एक भिन्नच वातावरण होते...
आत्ताच्या कोलेजमधे असतो तसा शिक्षकांसाठीचा चबूतरा,स्मराकाचा अष्टकोनी आकार,सताड येणारा सूर्यप्रकाश,अनेक नेत्यांचे फोटो,
इतर वर्गापासून असणारे त्याचे अंतर आणि त्याच्याभोवती असणारे प्रांगन.
पण हे सर्व माझ्या वाट्याला फार काळ आले नाही,माझ्या वडिलांची थोड्याच दिवसात बदली झाली.