सोमवार, ११ जून, २०१२
माझे आकाशदर्शन
लहानपणापासूनच याबद्दल विशेष आकर्षण होत.माझं भूगोल विषयांचे knowledge फारसं चांगलं नव्हत तसं तें आत्ताही नाहीये.पण.....
मागे माझ्या एकेठिकाणी वाचनात आले कि एप्रिल महिना हा आकाश निरीक्षणासाठी उत्तम असतो,निरभ् आकाश,नुकतीच झालेली वसंत ऋतुची सुरुवात.
शुक्रवार, १८ मे, २०१२
काही अलिखित नियम.....त्यांचे फायदे अन तोटे
१.बसमधून/ट्रेनमधून उतरताना कधीही शेवटी उतरु नये. >>> वरती चढत असणारे तुडवतात.
२ लग्नाच्या पंगतीत कधीही शेवटी बासु नये.>>> पत्रावळीत सर्व पदार्थ मिळतीलच असे नाही.
३.submission कधीही पहिल्या वेळेत करू नये.>>> डझनभर शेरे मिळतात.
४.पकाऊ मीटिंग मधे एखादतरी googly question विचारावा >>> नंतर झोप काढता येते.
शुक्रवार, १३ एप्रिल, २०१२
सातारा (पुणे By pass)
सन - २००८
स्थळ - पनवेल बस स्थानक
वेळ - सांय ६.३०
आमच्या एक मित्राच्या (बाळासाहेब) घराच्या "वास्तुशांतीसाठी" मी माझ्या दोन मित्रांसोबत (विक्रांत,प्रदीप) साताऱ्याला जायला निघालो.स्वातंत्र्यदिवसाच्या पुर्वसंधेचा हा प्रवास फारच thrilling होता.
भरपूर वेळ आमी मित्र गाडीची वाट पाहत उभे होतो.मुंबईकडून येणाऱ्या सर्वच बसेस भरून येत होत्या.
अर्धा ते पाऊन तास वाट पाहिल्यावर आम्ही कळंबोलीला जायचं ठरवलं.
वेळ - सांय ७.३०
इथेही तीच परस्थिती होती.
पुन्हा अर्धा तास वाट पाहिल्यावर आम्ही standing ने जायचं ठरवले.
तशी आम्हाला उभे राहण्याची सवय असल्यामुळे काही वाटत नव्हते, पण प्रदीपला मात्र जड जाणार असे वाटत होते. तो पडला बिचारा A/C DEPT.(Cubical मधला) त्याला फारशी सवय नव्हती.आणि बस स्वारगेटला जाणार म्हणजे किमान १ तास तरी जास्तीचा लागणार होता.
पनवेल सोडल्यावर, तिकीट काढताना आम्ही conductor ला विचारले कि आपण Express Highway ने जाऊया का?
Conductor: तस आपण नाही करू शकत.
आम्ही: साहेब आपण लवकर जाऊ ना.
Conductor: ते नियमात बसत नाही.
आम्ही : साहेब जुन्या रोडवर Traffic jam आहे.
Conductor : तुम्हाला कस कळलं?
आम्ही : साहेब "Breaking News" होती TV वर
Conductor : Toll कुठून देणार?
आम्ही : साहेब आम्ही देतो.
इतर प्रवाश्यानीही जोर दिल्यावर साहेब तयार झाले....
Conductor : ठीक आहे
आम्ही मग थोड्या passengers कडून पैसे जमा केले(toll साठी ) आणि गाडी Express Highway ला टाकली.
स्थळ - चांदणी चौक,पुणे
वेळ - रात्री ९.३०
पुण आल्यानंतर परत आम्ही सर्व passengers ना विचारलं,एक दोन जन पुण्याला जाणारे होते त्यांना पटवल.चांदणी चौकात (ज्याला अस का म्हणतात ते मला अजून कळालेलं नाही) उतरवल.
(त्या प्रवाश्यांनी पुणेरीपन न दाखवता आमच कसकाय ऐकल हे सुद्धा एक न उकलणार कोडच आहे
माझ्या मते ते मुळचे,स्थाईक पुणेकर नसावेत)
प्रदिपसाठी एव्हाना बसायला जागाही मिळाली होती.रात्रही झाली होती.संध्याकाळच मस्त गार वांर खात आम्ही उरलेला पुढचा प्रवास सुरु केला....
बुधवार, ४ एप्रिल, २०१२
स्मारक
मागे, मला अलिबागला जाताना स्वातंत्र्य सैनिकांचे एक हुतात्मा स्मारक दिसले....आणि मी बालापनात पोचलो.
कदाचित भरपूर लोकांना ते कसे असते,कसे दिसते ते माहितीही नसेल. असो...
तेंव्हा मी सातवीत होतो,वर्ग कमी असल्यामुळे आमच्या शालेचा हा वर्ग स्मारकात भरत असे.
त्या वर्गात एक भिन्नच वातावरण होते...
आत्ताच्या कोलेजमधे असतो तसा शिक्षकांसाठीचा चबूतरा,स् मराकाचा अष्टकोनी आकार,सताड येणारा सूर्यप्रकाश,अनेक नेत्यांचे फोटो,
इतर वर्गापासून असणारे त्याचे अंतर आणि त्याच्याभोवती असणारे प्रांगन.
पण हे सर्व माझ्या वाट्याला फार काळ आले नाही,माझ्या वडिलांची थोड्याच दिवसात बदली झाली.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
